Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वराचा सन्मान कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी याहवेहचा सन्मान कर;

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 3:9
30 Iomraidhean Croise  

हा जो धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल; आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करीन.”


तेव्हा सादोक घराण्यातला अजर्‍या मुख्य याजक त्याला म्हणाला, “लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हांला पोटभर खायला मिळून पुष्कळ शिल्लकही राहते; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे; जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे.”


आणि आपल्या देवाला शोधायला देवाच्या मंदिरातील सेवा, नियमशास्त्र व आज्ञा ह्यांच्यासंबंधाने जे काम त्याने आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभले ते त्याने पूर्ण मनोभावे केले व त्यात त्याला यश आले.


आमची भांडारे भरलेली असावीत; त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात; आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत;


आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा.


शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ.


आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.


आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”


उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल.


जो गरिबाला छळतो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करतो; पण जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.


तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही.


मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


मळलेल्या कणकेची पोळी परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी.


तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले.


आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.


आणि लेव्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan