Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव; आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 3:5
24 Iomraidhean Croise  

ह्यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली ती त्याने ऐकली.


तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन;1 तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्यासमोर मी समर्थन करीन.


ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्‍चल व सर्वकाळ टिकणार्‍या सीयोन डोंगरासारखे आहेत.


परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल;


आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.


परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा; त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा; जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो त्याच्यावर जळफळू नकोस.


अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)


परमेश्वरावर तुझा भाव असावा, म्हणून मी तुला ती वचने आज कळवली आहेत.


धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव.


जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.


तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणार्‍या मनुष्याच्या हाती नाही.


परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये;


कधी कधी मेघ थोडेच दिवस निवासमंडपावर असे. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत.


मेघ निवासमंडपावर छाया करून दोन दिवस, एक महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत; तो वर गेला म्हणजे ते कूच करीत.


परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.


ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan