Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 3:3
23 Iomraidhean Croise  

तू कालचा आलेला माणूस; मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडेतिकडे दौडवत का फिरवावे? तर तू आपला परत जा, आणि आपल्या भाऊबंदांनाही परत ने; दया व सत्य ही तुझ्यासमागमे राहोत.”


मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.


परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्‍यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत.


दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे;


हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले;


परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली : “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,


कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.


दुष्टपणाची मसलत करणारे भ्रांत नव्हत काय? चांगल्याची मसलत करणार्‍यांना दया व सत्य ही प्राप्त होतात.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


दया व सत्य ही राजाचे रक्षण करतात; तो दयेने आपले सिंहासन दृढ करतो.


ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.


ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव.


“यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे; त्यांच्या हृदयपटावर, त्यांच्या वेद्यांच्या शृंगांवर खोदले आहे;


नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.


त्याच्या मुखात सत्याचे नियमशास्त्र होते, त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही; तो माझ्याबरोबर शांतीने व सरळतेने वागला, व त्याने अनेकांना अधर्मापासून वळवले.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.


शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर ‘मांसमय अंत:करणरूपी पाट्यांवर’ ‘कोरलेले’, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात.


(कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.)


त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव.


परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan