Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 3:10
15 Iomraidhean Croise  

तेव्हा सादोक घराण्यातला अजर्‍या मुख्य याजक त्याला म्हणाला, “लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हांला पोटभर खायला मिळून पुष्कळ शिल्लकही राहते; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे; जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे.”


आणि आपल्या देवाला शोधायला देवाच्या मंदिरातील सेवा, नियमशास्त्र व आज्ञा ह्यांच्यासंबंधाने जे काम त्याने आपल्या देवाच्या भजनी लागून आरंभले ते त्याने पूर्ण मनोभावे केले व त्यात त्याला यश आले.


आमची भांडारे भरलेली असावीत; त्यांतून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात; आमच्या कुरणांत आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत;


जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.


ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो


मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील.


कोठारांत काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून ह्यांना काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हांला आशीर्वाद देईन.”


आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”


आणि लेव्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल.


तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan