Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस, परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 3:1
31 Iomraidhean Croise  

मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.


माझे दुःख पाहा, त्यापासून मला सोडव; कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.


मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.


हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे; तू आपल्या दासाचा शोध कर; कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही.


मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.


दुर्जनांच्या पाशांनी मला वेष्टले, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.


तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहेस.


त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन.


आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.


माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;


पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो;


माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील,


माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.


ते मद्य प्याले तर नियमशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील.


कारण मी तुम्हांला उत्तम शिकवण देतो; माझे नीतिशिक्षण सोडू नका.


ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस; ती आपल्या अंतःकरणात ठेव.


ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर; ती विसरू नकोस, माझ्या तोंडच्या वचनाला पराङ्मुख होऊ नकोस;


ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय?


ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.


ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.


तुम्ही स्वत:विषयी सावधगिरी बाळगा; नाहीतर तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल.


मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या पित्याचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल.


ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल; आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाळ राहाल.


जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथ पूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan