Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 26:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? अशा माणसापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 26:12
17 Iomraidhean Croise  

मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो.


आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजांसमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.


योग्य उत्तर देणार्‍या सात जणांपेक्षा आळशी आपणाला शहाणा समजतो.


मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल.


धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो.


जो आपल्या मनावर भरवसा ठेवतो तो मूर्ख, पण जो सुज्ञतेने चालतो त्याचा बचाव होतो.


बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.


तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.


जे आपल्या दृष्टीने ज्ञानी व आपल्या मते समंजस त्यांना धिक्कार असो.


ह्या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “दुसर्‍या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, जकातदार व कसबिणी तुमच्याआधी देवाच्या राज्यात जातात.


परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो.


तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले.


येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हांला पाप नसते; परंतु आम्हांला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.


परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.


मी श्रीमंत आहे, मी ‘धन मिळवले आहे,’ व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan