Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्यांचे अंत:करण बलात्कार करण्याचा बेत करते, त्यांच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण त्यांचे अंतःकरण हिंसाचार करण्याच्या योजना करतात, आणि त्यांचे ओठ भांडण लावण्याविषयी बोलतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 24:2
21 Iomraidhean Croise  

त्यांना अपकाराचा गर्भ राहून ते अरिष्टास जन्म देतात; त्यांच्या पोटात कपट उद्भवते.”


त्याच्या तोंडी शाप, कपट व जुलूम सदैव आहेत; त्याच्या जिभेवर उपद्रव व दुष्टाई आहेत.


ते आपल्या मनात दुष्कर्मे योजतात; ते सतत लढाई उपस्थित करतात,


मनात कपट असून आपल्या शेजार्‍यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस.


तो अंथरुणावर पडल्यापडल्या अनीतीच्या योजना करतो; तो कुमार्ग धरून राहतो, वाइटाचा वीट मानत नाही.


माझा जीव घेण्यास टपणारे मला धरण्यासाठी फासे मांडतात; माझे अनिष्ट चिंतणारे अपकारक गोष्टी बोलतात, ते दिवसभर कपटाच्या मसलती करत राहतात.


पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो.


माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस.


जो दुष्कर्म करण्याचे योजतो, त्याला लोक घातकी माणूस म्हणतात.


त्याच्या मनात उद्दामपणा असतो; तो दुष्कर्माची योजना करीत असतो; तो वैमनस्य पसरवतो.


दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय,


ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता;


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


तरीपण केवळ निर्दोष्यांचा रक्तपात, जुलूमजबरी व अन्याय्य धनप्राप्ती ह्यांकडे तुझे डोळे व मन लागले आहे.”


दुष्कर्म जोमाने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवतात; सरदार फर्मावतो ते न्यायाधीश लाच घेऊन करतो; वेडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवतो; असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणतात.


“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैर्‍या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?


शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan