Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 राजाचा दरारा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याला जो राग आणतो तो आपल्या जिवाविरुद्ध पाप करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे; जो त्याचा राग जागृत करतो त्याची प्राणहानी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 20:2
10 Iomraidhean Croise  

शलमोन राजाने परमेश्वराची शपथ वाहून म्हटले, “अदोनीयाने ही जी मागणी केली आहे तिच्यामुळे त्याने आपल्या प्राणावर संकट आणले आहे, तसे न घडले तर परमेश्वर माझे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक अनिष्ट करो.


ज्या परमेश्वराने माझी स्थापना केली, माझा बाप दावीद ह्याच्या गादीवर मला बसवले आणि आपल्या वचनानुसार माझे घराणे स्थापन केले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, आजच्या आज अदोनीयास देहान्त शासन होईल.”


राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.


परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानी करून घेतो; जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.”


तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.


ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्‍चिमेकडून थरथर कापत येतील.


सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”


तू बहुत राष्ट्रांना नष्ट केल्यामुळे आपल्या घराण्यावर अप्रतिष्ठा आणली आहेस, आपल्या जिवाचा गुन्हेगार झाला आहेस.


पाप करून आपल्या जिवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे पवित्र आहेत; ह्या प्रकारे ती इस्राएल लोकांना ताकीद दिल्याची चिन्हे होतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan