Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील,

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 2:1
21 Iomraidhean Croise  

त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी माघार घेतली नाही; माझ्या स्वतःच्या मनोरथापलीकडे2 मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत.


ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.


सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत.


सुज्ञ पुत्र नियमशास्त्र पाळतो, पण खादाडांचा सोबती आपल्या बापास खाली पाहायला लावतो.


माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत;


मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.


माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल.


ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.


माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव.


ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय?


ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत.


स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.


परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.


मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या.


“तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.”


ती समुद्रापलीकडे नाही; ‘आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणील आणि आम्हांला ती ऐकवील’ असे तुला म्हणावे लागणार नाही.


ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan