Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही— घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात!

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 19:2
18 Iomraidhean Croise  

तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा करण्यासाठी गेला असता त्याला एक रानवेल सापडली; तिच्यावरील कडू इंद्रायणे तोडून त्याने ओटीत भरून आणली; ती चिरून त्या शाकभाजीच्या बहुगुण्यात घातली; ती कडू होती हे त्यांना ठाऊक नव्हते.


मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली,


कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.


नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात.


ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो.


उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.


फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्‍याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.


स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते; पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही.


दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळवण्याची उतावळी करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही.


बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.


उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.


मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.


त्याच्या डाहळ्या वाळल्या म्हणजे त्या तोडून टाकतील, स्त्रिया येऊन त्या जाळतील; ते लोक ज्ञानशून्य आहेत म्हणून त्यांच्या उत्पन्नकर्त्याला त्यांचा कळवळा येत नाही, त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.


त्यांनी पित्याला व मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील.


मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.


माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी;


Lean sinn:

Sanasan


Sanasan