Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 19:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा, निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 19:1
16 Iomraidhean Croise  

मी तर सात्त्विकपणे वागेन; माझा उद्धार कर, माझ्यावर दया कर.


तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो; त्याची संतती आशीर्वादित असते.


नीतिमान आपल्या शेजार्‍याला मार्ग दाखवतो, पण दुर्जनांचा मार्ग लोकांना बहकावतो.


जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानतो.


बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे;


अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे.


मनुष्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते; लबाडापेक्षा दरिद्री बरा.


जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.


धनवान असून जो दुटप्पी मनाचा आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा.


तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा.


कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत; तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते.


मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?


तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर; कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.”


माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काहीएक मनात आणू नये; तो आपल्या नावासारखाच आहे; त्याचे नाव नाबाल (मूर्ख) असे आहे, आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे; ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामींनी पाठवले होते त्यांना मी पाहिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan