Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 17:3
21 Iomraidhean Croise  

माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे.


परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे; त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन.


“खरोखर रुप्याची खाण असते; लोक जे सोने शुद्ध करतात त्याचेही ठिकाण असते.


हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण.


हे परमेश्वरा, मला कसास लाव, माझी पारख कर; माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पाहा.


कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस.


अधोलोक आणि विनाशस्थान1 ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत; तर मग मनुष्यजातीची अंत:करणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत!


मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.


शहाणा सेवक लज्जा आणणार्‍या मुलावर हुकमत चालवील, व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल.


मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.


रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय.


मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे.


“प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.”


“मानवपुत्रा, इस्राएल घराणे माझ्या दृष्टीने केवळ गाळ झाले आहे; भट्टीतील पितळ, कथील, लोखंड व शिसे ह्यांसारखे ते सर्व आहेत, ते रुप्यातील गाळ झाले आहेत.


सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.


तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’


तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले.


तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.


मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी ‘मने व अंत:करणे ह्यांची पारख करणारा’ आहे आणि तुम्हा ‘प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan