Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सुज्ञाची जिव्हा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते, परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 15:2
14 Iomraidhean Croise  

माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे.


पाहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्‍गार काढतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवारीच आहेत; कारण, “ऐकतो कोण?” असे ते म्हणतात;


शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते.


प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडतो.


मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!


नीतिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते.


ज्ञान्यांची वाणी विद्येचा प्रसार करते; मूर्खांचे हृदय स्थिर नसते.


ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.


म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे.


मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?


काम फार पडल्याने त्याचे स्वप्न पडते तशीच फार वाचाळतेने मूर्खाची वाणी प्रकट होते.


शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan