Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 15:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 15:1
16 Iomraidhean Croise  

इस्राएल लोक यहूद्यांना म्हणाले, “महाराज दहा हिश्शांनी आमचे आहेत; तुमच्याहून आमचा दाविदावर जास्त हक्क आहे; तर तुम्ही आम्हांला तुच्छ समजून आमच्या महाराजांना माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला का घेतला नाही?” इस्राएल लोकांच्या भाषणापेक्षा यहूदी लोकांचे भाषण कठोरपणाचे होते.


ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”


ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांवर मेहेरनजर करून ह्यांना संतुष्ट राखाल आणि मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर हे आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”


तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय?


द्वेष कलह उत्पन्न करतो; प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.


तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो;


बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते.


लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो.


रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.


उद्दामपणा करणारे नगराला आग लावून देतात, पण सुज्ञ जन क्रोधाला घालवतात.


असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan