Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मूर्खाचे तोंड गर्विष्ठपणाने शब्दांचा मारा करते, पण सुज्ञ मनुष्यांचे ओठ त्यांचे रक्षण करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 14:3
21 Iomraidhean Croise  

जिव्हाप्रहार होऊ लागला म्हणजे तू लपवला जाशील; विनाश प्राप्त झाला असता तू त्याला डगमगणार नाहीस.


खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको.


नीतिमानाविरुद्ध गर्वाने, तिरस्काराने व उद्दामपणाने बोलणार्‍यांची वाचा बंद पडो.


माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.


दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांना सोडवील.


जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते;


बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते.


मूर्ख कलहाला तोंड देतो; त्याचे मुख चापटीला आमंत्रण करते.


मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय.


गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.


जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल.


लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो.


त्याच्या डोक्याला दहा शिंगे असून आणखी एक शिंग निघाले त्यामुळे तीन शिंगे उपटून पडली; ह्या शिंगाला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्याबरोबरच्या इतर शिंगांहून लठ्ठ दिसत होते; ह्या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली.


भ्रमात असणार्‍या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात.


त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.


धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.


गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan