Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मनुष्याच्या जिवाची खंडणी त्याची संपत्ती होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मनुष्याची श्रीमंती त्याच्या जिवासाठी खंडणी देईल, परंतु गरीब मनुष्य अशा धमकीला प्रतिसाद देऊ शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 13:8
15 Iomraidhean Croise  

त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर दहा हजार लोक आणि सर्व कारागीर व लोहार ह्यांना कैद करून नेले; देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाही.


देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.


सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.


त्याच्यावर खंडणी लादल्यास आपला जीव वाचवण्या-साठी त्याने आपल्यावर लादलेली खंडणी देऊन टाकावी.


कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काहीएक नसते; कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवतात तरी त्यांच्याजवळ बहुत धन असते;


नीतिमानांची ज्योती प्रज्वलित असते; दुर्जनांचा दीप मालवतो.


सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते.


तो कसल्याही खंडणीची पर्वा करणार नाही; त्याला तू बहुत देणग्या दिल्यास तरी त्याचे समाधान होणार नाही.


तथापि जे लोक लाचार असून ज्यांच्याजवळ काहीएक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यहूदा देशात राहू दिले; त्याच वेळेस त्याने त्यांना द्राक्षांचे मळे व शेते दिली.


पण त्यांपैकी दहा जण इश्माएलास म्हणाले की, ‘आम्हांला मारून टाकू नकोस; कारण आमच्याजवळ शेतात लपवून ठेवलेला गहू, जव, तेल व मध ह्यांचा साठा आहे.’ तेव्हा त्याने त्यांना सोडून दिले, त्यांच्या बांधवांबरोबर त्यांना मारले नाही.


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?


कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan