Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आळशी मनुष्याची भूक कधीही मिटत नाही, परंतु परिश्रमी मनुष्याच्या इच्छांचे पूर्णपणे समाधान केले जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 13:4
26 Iomraidhean Croise  

त्याच दिवशी असे झाले की इसहाकाचे चाकर जी विहीर खणत होते तिच्याविषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले आहे.


वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील;


सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो.


उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल.


जो आपले शेत स्वत: करतो त्याला भरपूर अन्न मिळते. परंतु जो निरर्थक गोष्टींमागे लागतो तो अक्कलशून्य होय.


उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते.


आळस हा आपली शिकार धरीत नाही, पण उद्योग हा मनुष्याचे मोलवान धन आहे.


जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते;


नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो.


हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही.


आळश्याची वासना त्याला मारून टाकते; कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात.


उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.


एकदा मी आळशाच्या शेताजवळून, बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो;


तेव्हा तो काटेर्‍यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले.


आळशी म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे, चवाठ्यावर सिंह आहे.”


लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो.


अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो;


जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य.


“मी पेहराव उतरवला आहे, तो पुन्हा कसा लेऊ? मी पाय धुतले आहेत, ते पुन्हा कसे मळवू?”


परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणार्‍या झर्‍याप्रमाणे होशील,


याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”


नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”


आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी;


नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, “सर्व लोकांनी तेथे जायला नको, फक्त दोन-तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan