Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो, परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 13:3
18 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार सांभाळ.


तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर,


मी म्हणालो की, “मी आपल्या जिभेने पाप करू नये म्हणून आपल्या चालचलणुकीस जपेन; माझ्यासमोर दुर्जन आहे तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम घालून ठेवीन.”


शहाणे जन ज्ञानसंग्रह करतात, परंतु मूर्खाचे तोंड म्हटले म्हणजे साक्षात अरिष्ट होय.


फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.


सुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो.


मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो.


आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.


मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते.


जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.


मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय.


जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, म्हणून बडबड करणार्‍याची संगत धरू नकोस.


जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो, तो संकटांपासून आपला जीव बचावतो.


आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.


तो तिला म्हणाला, “कधी न वापरलेल्या नव्या दोरांनी मला आवळून बांधले, तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”


म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, “माझ्या डोक्याला कधी वस्तरा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाजीर आहे; माझे मुंडण केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan