Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सद्‍गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडवणारी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे, परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 12:4
16 Iomraidhean Croise  

डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.


नीतिमानांचे विचार यथान्याय असतात; दुर्जनांच्या मसलती कपटाच्या असतात.


प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.


शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.


ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.


भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला.


भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या एका कोपर्‍याला बसणे पुरवले.


लग्न झालेली त्रासदायक स्त्री, व धनिणीची वारस झालेली दासी.


“बहुत स्त्रियांनी सद्‍गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस.”


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही.


पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.


तर मुली, भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांना ठाऊक आहे की तू सद्‍गुणी स्त्री आहेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan