Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 सात्त्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सात्विक व सरळ जीवन जगणारा निर्भयतेने चालतो, परंतु जो वाकड्या मार्गानी चालतो तो पकडला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 10:9
17 Iomraidhean Croise  

अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


पाहा, देव सात्त्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही. तो कुकर्म्याला हाती धरत नाही.


मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.


सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


ज्याचे चित्त उन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही; ज्याची जिव्हा कुटिल असते तो विपत्तीत पडतो.


त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल.


कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


सरळ मार्गाने चालणार्‍याचा बचाव होतो, पण दुटप्पी मनाच्या मनुष्याचा अचानक अधःपात होतो.


तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही.


ह्यास्तव त्यांना भिऊ नका; कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


त्याचप्रमाणे काही चांगली कृत्येही उघड आहेत, आणि जी गुप्त आहेत तीही गुप्त राहू शकत नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan