Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते; पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक मनुष्याच्या नावाचा उपयोग करतात, परंतु दुष्ट मनुष्याचे नाव सडून नाहीसे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 10:7
20 Iomraidhean Croise  

आणि त्याच्या पुत्राकडे मी एक वंश राहू देईन, म्हणजे माझ्या नामाची स्थापना व्हावी म्हणून मी यरुशलेम नगर निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद ह्याची ज्योती माझ्यासमोर निरंतर जळत राहील.


मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल असे ह्याचे संरक्षण करीन.”


त्याला दावीदपुरात राजांमध्ये मूठमाती देण्यात आली. कारण त्याने इस्राएलात देव व त्याचे मंदिर ह्यांच्यासंबंधाने चांगले काम केले होते.


हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीद वंशाच्या कबरस्तानातील उंचवट्यावर मूठमाती दिली. तो मृत्यू पावल्यावर सर्व यहूदी व यरुशलेमकर ह्यांनी त्याच्यासंबंधाने आदर व्यक्‍त केला. त्याचा पुत्र मनश्शे हा त्याच्या जागी राजा झाला.


देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही.


त्याच्या मातेचे उदर त्याला विसरेल. कीटक त्याच्यावर चंगळ करतील; त्याचे कोणाला स्मरण उरणार नाही; असा दुष्टांचा वृक्षाप्रमाणे निःपात होईल.


लोक टाळ्या पिटून त्याची छीथू करतील, त्याच्या स्थानातून त्याला हुसकून लावतील.”


त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.


त्याची पातके परमेश्वरापुढे सदा राहोत; तो पृथ्वीवरून त्यांचे स्मरण नाहीसे करो.


तो कधीही ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.


वाईट करणार्‍यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.


नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.


माझे वैरी माझ्याविरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की, “हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल?”


चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.


त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्‍यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ.


“मी त्यांच्यावर उठेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आणि बाबेलचे नाव व अवशेष, त्यांचे पुत्रपौत्र ह्यांचा मी समूळ उच्छेद करीन, असे परमेश्वर म्हणतो.


हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.


मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.”


कारण ‘त्याने’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील!


Lean sinn:

Sanasan


Sanasan