Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात; दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, पण बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत, परंतु दुष्ट मनुष्याच्या मुखात हिंसाचार दडलेला असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 10:6
14 Iomraidhean Croise  

मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला असता एस्तेरच्या मंचकावर हामानास ओठंगलेले त्याने पाहिले, तेव्हा राजा म्हणाला, “ह्या घरात आणि माझ्यासमोर हा राणीवर जबरदस्ती करू पाहतो काय?” राजाच्या तोंडून हे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हामानाचे तोंड झाकले.


नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी.


हे पाहून सरळ मनाचे लोक हर्ष पावतात; सर्व दुष्टाई आपले तोंड बंद करते. जो कोणी बुद्धिमान असेल त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, त्याने परमेश्वराची दया ओळखावी.


नीतिमानाचे मुख जीवनाचा झरा आहे; दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते.


उन्हाळ्यात जमवाजमव करतो तो मुलगा शहाणा होय; जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद होय.


जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल.


पण जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यांना चांगला आशीर्वाद मिळेल.


स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते; पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही.


परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण नीतिमानांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो.


नीतिमानांविषयी म्हणा की त्यांचे कल्याण होणार; कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगणार.


तू आपला भाऊ याकोब ह्याच्यावर गहजब केलास म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील, व तुला कायमचे नष्ट करतील.


आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.


तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan