Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 10:3
23 Iomraidhean Croise  

अन्नान्न करीत तो चोहोकडे भटकतो. अंधकारमय दिवस आपल्यासमीप आहे हे त्याला ठाऊक आहे;


त्याच्या घरातील संपदा चालती होईल; देवाच्या क्रोधदिनी ती धुऊन जाईल.


दुष्काळात मृत्यूपासून, युद्धात तलवारीच्या धारेपासून तो तुझा बचाव करील.


तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल.


त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.


ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील.


मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.


परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल;


नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.


विपत्ती आली असता दुर्जन चीत होतो, पण नीतिमानास मरणसमयीही उमेद असते.


लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो.


नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.


तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही;


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan