Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 10:2
15 Iomraidhean Croise  

क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते.


न्याय्यत्वाच्या मार्गात जीवन आहे; त्याच्या वाटेत मरण नाही.


घाईने मिळवलेले धन क्षय पावते. परंतु जो मूठ-मूठ साठवतो त्याचे धन वृद्धी पावते.


असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्‍या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.


ते आपले रुपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांना आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्यापासून त्यांच्या जिवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे राज्य करावे.


आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व — माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्त्व नव्हे — तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे असावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan