Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दु:खी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत. शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो, पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु:खी करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 शलोमोनाची नीतिसूत्रे: शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो, परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 10:1
16 Iomraidhean Croise  

त्याने तीन हजार नीतिसूत्रे कथन केली व एक हजार पाच गीते रचली.


इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे :


सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक निषेध ऐकत नाही.


शहाणा मुलगा बापाला आनंद देतो; मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो;


मूर्खाला जन्म देतो तो दु:खाची जोड करतो; मूर्खाच्या बापाला आनंद नाही.


मूर्ख मुलगा आपल्या बापाला दु:ख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.


मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे; बायकोच्या कटकटी सतत गळणार्‍या ठिपक्यांप्रमाणे आहेत.


हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला.


माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणार्‍यास मी प्रत्युत्तर देईन.


छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते.


तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.


ज्या मनुष्याला ज्ञानाची आवड असते तो आपल्या बापाला आनंदित करतो, पण वेश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची धूळधाण करतो.


उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.


तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादले आहे त्यावर तो ताबा चालवणार; हेही व्यर्थच!


Lean sinn:

Sanasan


Sanasan