Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 1:11
19 Iomraidhean Croise  

भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे.


कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली.


ते एकत्र जमतात, ते टपून बसतात; ते माझ्या पावलांवर पाळत ठेवतात; ते माझा जीव घेण्यास पाहतात.


कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात, आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात.


ते आपल्या रक्तपातासाठी टपतात, ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात.


दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांना सोडवील.


अरे दुष्टा, नीतिमानाच्या घराचा नाश करण्यास टपू नकोस, त्याच्या विश्रांतिस्थानाचा बिघाड करू नकोस;


चोराचा भागीदार आपल्या आत्म्याचा द्वेष्टा होय; तो शपथ ऐकतो तरी काही सांगत नाही.


पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.


मी तर सौम्य कोकरासारखा होतो; नकळत ते मला वधण्यास नेत होते. “ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू,” असा त्यांचा माझ्याविरुद्ध कट चालला होता.


कारण माझ्या लोकांमध्ये दुष्ट जन आढळतात, ते फासेपारध्याप्रमाणे दबा धरतात; ते सापळा मांडून माणसांना धरतात.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.


तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करायची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेसहित सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”


आणि, मेहेरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan