Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याची नीतिसूत्रे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे:

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 1:1
14 Iomraidhean Croise  

मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्याला चांगली बळकटी आणली.


परमेश्वराने आपल्या वचनानुसार शलमोनाला शहाणपण दिले; हीराम व शलमोन ह्यांच्यामध्ये सख्य राहिले आणि त्या दोघांनी करारमदार केले.


पाहा, तुला एक पुत्र होईल तो शांतताप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा देईन; त्याचे नाव शलमोन (शांतताप्रिय) असे होईल; त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलास शांती व स्वस्थता देईन.


परमेश्वराने मला बहुत पुत्र दिले आहेत, त्या सर्वांतून इस्राएलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराच्या राजासनावर बसावे म्हणून त्याने माझा पुत्र शलमोन ह्याला निवडले आहे.


मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्याऐवजी राजा होऊन परमेश्वराच्या सिंहासनावर विराजमान झाला व भाग्यवंत झाला; सर्व इस्राएल लोक त्याच्या आज्ञेत असत.


आयुष्य, धन व मान ह्यांनी संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला; त्याचा पुत्र शलमोन त्याच्याजागी राजा झाला.


मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दु:खी.


हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला.


यरुशलेमेतील राजा दावीदपुत्र, उपदेशक1 ह्याची वचने :


उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.


ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत; मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan