फिलिप्पैकरांस 4:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे मी शिकलो आहे, ज्यामुळे कुठेही, कधीही मी समाधानी असतो, म्हणजे मी तृप्त असो किंवा भुकेला असो, विपुलतेत असो किंवा गरजेत असो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मला गरजेमध्ये राहणे, विपुलतेमध्ये राहणे हे माहीत आहे. कोणत्याही परिस्थितीत व प्रत्येक परिस्थितीत भरल्यापोटी अथवा भुकेला, संपन्नतेत किंवा विपन्नतेत, समाधानी कसे राहावे हे मला माहीत आहे. Faic an caibideil |