Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 2:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तो आजारी आहे, हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याचे अंत:करण जड झाले व तुम्हांला भेटण्याची त्याला उत्कंठा लागली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 कारण त्याच्या आजाराची वार्ता तुम्ही ऐकली म्हणून तुम्हा सर्वांना भेटावयास तो उत्सुक व चिंताक्रांत झालेला आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 2:26
23 Iomraidhean Croise  

अबशालोमाला भेटायला दावीद राजा फार आतुर झाला; कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते.


लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वराला म्हटले, “पाहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो, पण ह्या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा.”


विलाप करण्याचे मी विसरावे, मुखाची खिन्नता सोडून उल्लसित दिसावे, असे मी मनात आणले;


निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे; मी अगदी बेजार झालो आहे; माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.


मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.


सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.


अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला.


तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”


तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे;


आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.


मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंत:करणामध्ये अखंड वेदना आहेत.


एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.


आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात, व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात.


एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.


म्हणून मी विनंती करतो की, तुमच्याप्रीत्यर्थ मला होणार्‍या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हांला भूषणावह आहेत.


मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो;


माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.


तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठवण्याचे अगत्य वाटले;


तो खरोखर मरणोन्मुख झाला होता; तथापि देवाने त्याच्यावर दया केली; ती केवळ त्याच्यावर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून, माझ्यावरही केली.


म्हणून प्रियजनहो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.


त्याविषयी तुम्ही उल्लास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दु:ख सोसले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan