Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलिप्पैकरांस 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 बंधूंनो, माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या शुभवर्तमानाच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आता प्रिय बंधू भगिनींनो, जे माझ्याबाबतीत घडले त्यामुळे प्रत्यक्ष शुभवार्तेच्या कार्यात वाढ झाली आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलिप्पैकरांस 1:12
19 Iomraidhean Croise  

अदार जो बारावा महिना त्याच्या त्रयोदशीस राजाची आज्ञा व फर्मान अंमलात येऊन यहूदी लोकांवर वरचढ होण्याचा आशेचा दिवस समीप आला, पण सर्व उलट होऊन यहूदी लोक आपल्या वैर्‍यांवर वरचढ झाले;


कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस.


आता मला कळून आले की, सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिसर्‍यांनी इस्राएलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला.”


ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल.


तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.


तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हांला बाळगून आहे.


पण त्याचे शील तुम्हांला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.


फिलिप्पैकरांनो, तुम्हांलाही ठाऊक आहे की, सुवार्तेच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्यावाचून दुसर्‍या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही;


आणि तसेच हे माझ्या खर्‍या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.


प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.


ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणार्‍यासारखा बेड्यांचेदेखील दुःख सोसत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही.


तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली; आणि त्याने मला ‘सिंहाच्या जबड्यातून’ मुक्त केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan