Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




फिलेमोन 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 परंतु प्रीतीमुळे विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणून हे करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




फिलेमोन 1:9
17 Iomraidhean Croise  

मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.


उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस.


पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो;


तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.


आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;


कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात.


ह्या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे.


म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;


ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो;


वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यांमध्ये दृढ राहावे.


आणि तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे.


प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.


त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गार्‍हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हांला ठेवून घेऊ द्या; कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हांला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हांला दोष लागत नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan