Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते, त्यांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना, म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे आले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु त्यांच्यापैकी काही व्यक्ती असे होते ज्यांना वल्हांडण सण पाळता आला नाही, कारण ते विधीनुसार मृत देहामुळे अशुद्ध झाले होते. म्हणून त्याच दिवशी ते मोशे व अहरोनकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 9:6
16 Iomraidhean Croise  

मोशे आपल्या सासर्‍याला म्हणाला, “लोक देवाला विचारायला माझ्याकडे येतात;


तर आता माझे ऐक; मी तुला सल्ला देतो, आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवासमोर तू मध्यस्थ हो, आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे ने.


ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत.


त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये; आपल्या बापाचे किंवा आईचे सुतक धरू नये;


तो इस्राएल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्याशाप देऊ लागला तेव्हा त्याला मोशेकडे आणले. त्याच्या आईचे नाव शलोमीथ असे असून ती दान वंशातील दिब्री ह्याची मुलगी होती.


ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी ह्यांच्याकडे घेऊन गेले.


एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे;


एखादा मनुष्य डेर्‍यात मरण पावला तर त्याच्यासंबंधाने नियम हा : जो कोणी त्या डेर्‍यात जाईल किंवा राहत असेल त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.


खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या शवाला, मृत देहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने सात दिवस अशुद्ध असावे.


आणि शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेर्‍यावर व तेथील सर्व पात्रे, माणसे ह्यांच्यावर शिंपडावे; तसेच ज्याने हाडाला, वधलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे;


मोशे, एलाजार याजक, सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्या उभ्या राहून म्हणाल्या,


मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्वरापुढे मांडले.


“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण ह्यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे;


ते मोशेला म्हणाले, “एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहोत तर इस्राएल लोकांबरोबर नेमलेल्या समयी परमेश्वराला अर्पण आणण्याची आम्हांला का मनाई असावी?”


नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले, तेव्हा सकाळ होती आणि आपणांस विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan