Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर : पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर; मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्तरा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावीत आणि स्वत:ला शुद्ध करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांना शुद्ध करण्यासाठी हे करः पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 8:7
24 Iomraidhean Croise  

मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या-बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वत:ला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला.


मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.


एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत.


त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.


हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय. त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


ते जाळून टाकणार्‍याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे.


मोशेने अहरोनाला व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली.


कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल; असल्या मनुष्याचा इस्राएल लोकांतून उच्छेद व्हावा; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर शिंपडले नसल्यामुळे तो अशुद्ध होय; त्याच्या ठायी त्याचे अशुद्धपण तसेच राहते.


प्रत्येक वस्त्र, चामड्याची प्रत्येक वस्तू, बकर्‍याच्या केसांची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे.”


लेवी आपल्या पापाचे क्षालन करून शुद्ध झाले; त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पण केले; आणि त्यांना शुद्ध करण्याकरता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त केले.


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.


कारण बकर्‍यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात,


देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.


त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता ‘बाप्तिस्मा’ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे.


मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्‍याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan