Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 अहरोनाने तसे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने दीपस्तंभावरील दिव्यांचा उजेड समोर पडावा म्हणून दिवे लावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच अहरोनाने केले; त्याने दीपस्तंभाच्या समोरील बाजूस दिवे लावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 8:3
5 Iomraidhean Croise  

शुद्ध दीपवृक्ष, त्याचे दिवे म्हणजे रांगेने लावायचे दिवे, त्याची सर्व उपकरणे आणि दिव्यांसाठी तेल;


आणि परमेश्वरासमोर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


“अहरोनाला सांग की, तू दिवे पेटवशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा.”


दीपवृक्षाचे काम घडीव सोन्याचे होते; बैठकीपासून फुलांपर्यंत घडीव काम होते; परमेश्वराने मोशेला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडवला होता.


दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan