Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “अहरोनाला सांग की, तू दिवे पेटवशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “अहरोनाशी बोल व त्याला सांग, जेव्हा तू दिवे लावशील, तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्या पुढील बाजूस पडावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 8:2
19 Iomraidhean Croise  

तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.


तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.


आणि त्याच्यासाठी सात दिवे करून दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर ठेवावेत.


त्याने त्या दीपवृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.


शुद्ध दीपवृक्ष, त्याचे दिवे म्हणजे रांगेने लावायचे दिवे, त्याची सर्व उपकरणे आणि दिव्यांसाठी तेल;


आणि परमेश्वरासमोर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


अहरोनाने तसे केले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढच्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले.


तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही.


जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता.


शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.


माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या सात समया,


जे सात तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे, आणि सोन्याच्या त्या सात समयांचे ‘गूज’ हे आहे; ते सात तारे हे सात मंडळ्यांचे दूत आहेत; आणि सात समया ज्या तू पाहिल्या त्या सात मंडळ्या आहेत.


राजासनाच्या आतून ‘विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या’ आणि पेटलेल्या सात मशाली राजासनापुडे जळत होत्या; त्या देवाचे सात आत्मे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan