Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 8:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण इस्राएल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व नर माझेच आहेत; मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 इस्राएल लोकांतले, मनुष्यापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 इस्राएली लोकांतील प्रथम जन्मलेला प्रत्येक नर, तो मनुष्याचा असो किंवा पशूंचा, तो माझा आहे. जेव्हा मी इजिप्तचे सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी पवित्र केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 8:17
18 Iomraidhean Croise  

त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथमजन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषांचे प्रथमफळ मारले.


त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले.


त्याने मिसर देशातले प्रथमजन्मलेले सर्व, हामाच्या डेर्‍यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल ह्यांना मारले;


मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणार्‍या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व, आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्वराने मारून टाकले.


“इस्राएल लोकांमध्ये मनुष्य व पशू ह्या दोहोंच्या प्रथमजन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव; ते माझे आहेत.” बेखमीर भाकरीचा सण


दर्शनमंडप व वेदी मी पवित्र करीन; आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांनाही मी पवित्र करीन.


आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे.


ग्रामपशूंपैकी प्रथमवत्स परमेश्वराचा ठरलेला आहेच. त्याला कोणाला पवित्र करून वाहता येणार नाही; तो गुराढोरांपैकी असो किंवा शेरडामेंढरांपैकी असो, तो परमेश्वराचाच आहे.


कारण प्रथमजन्मलेले सर्व माझेच आहेत; ज्या दिवशी मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारून टाकले त्याच दिवशी इस्राएल लोकांतील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले; ते माझेच आहेत; मी परमेश्वर आहे.”


इस्राएल लोकांतील प्रथमजन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे.


(म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा,’ असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे,)


तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?


आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो.


तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते ‘कराराचे रक्त’ ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते?


त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्‍याने’ त्यांना शिवू नये.


आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan