Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्राएल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांना वेगळे करा. लेवी माझेच होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 8:14
13 Iomraidhean Croise  

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्‍या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.


मी स्वत: तुमच्या लेवी बांधवांना इस्राएल लोकांमधून घेतले आहे; दर्शनमंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हांला दान म्हणून ते दिले आहेत;


“इस्राएलातल्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे; लेवी वंशातील लोक माझेच आहेत;


“इस्राएलांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे; लेवी वंशातील लोक माझे आहेत; मी परमेश्वर आहे.


लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर; इस्राएल लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत.


“इस्राएल लोकांना असे सांग की, कोणा पुरुषाने अथवा स्त्रीने नाजीराचा नवस, म्हणजे स्वतःला परमेश्वराला वाहून घेण्याचा विशेष नवस केला,


मग लेव्यांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे.


कारण इस्राएल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व नर माझेच आहेत; मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले.


पवित्र जन होण्यासाठी बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून :


तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता,


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्या वेळेस परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले; ते आजवर चालू आहे.


असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan