Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 6:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की, तुम्ही इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 अहरोन व त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 अहरोन आणि त्याच्या पुत्रांना सांग, “तुम्ही इस्राएली लोकांस आशीर्वाद देतांना असे म्हणावे:

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 6:23
27 Iomraidhean Croise  

त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, “बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्‍यांच्या नगरांची सत्ता पावो.”


याकोब फारोला आशीर्वाद देऊन त्याच्यापुढून निघून गेला.


योसेफाने आपला बाप याकोब ह्याला आणून फारोपुढे हजर केले, तेव्हा याकोबाने फारोला आशीर्वाद दिला.


त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले : इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणतील की, “एफ्राईम व मनश्शे ह्यांच्याप्रमाणे देव तुझे करो!” अशा प्रकारे त्याने एफ्राइमास मनश्शेहून श्रेष्ठ केले.


त्याने उभे राहून सर्व इस्राएल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला; तो म्हणाला,


अम्रामाचे पुत्र अहरोन व मोशे; अहरोनास वेगळे करण्यात आले ते अशासाठी की त्याने व त्याच्या वंशजांनी परमपवित्र वस्तू निरंतर पवित्र राखाव्यात; परमेश्वरासमोर निरंतर धूप जाळावा, त्याची सेवाचाकरी करावी व त्याच्या नामाने आशीर्वाद द्यावा.


मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकांना आशीर्वाद दिले; त्यांची वाणी देवाने ऐकली, आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत, स्वर्गापर्यंत जाऊन पोहचली.


लोकांनी काम केले ते सर्व मोशेने पाहिले. ते त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते, म्हणून त्याने त्यांना आशीर्वाद दिला.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


त्या तुम्हांला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो.


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्या वेळेस परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले; ते आजवर चालू आहे.


तेव्हा लेवी वंशातल्या याजकांनी पुढे व्हावे; कारण त्यांनी परमेश्वराची सेवा करावी, त्याच्या नावाने आशीर्वाद द्यावा, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक वादाचा व मारामारीचा निर्णय व्हावा ह्यासाठी तुझा देव परमेश्वर ह्याने त्यांना निवडले आहे.


देवाचा भक्त मोशे ह्याने आपल्या मरणापूर्वी इस्राएल लोकांना आशीर्वाद दिला तो असा :


‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’


श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणार्‍या लेवीय याजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अंमलदार आणि न्यायाधीश तसेच देशात जन्मलेले आणि उपरे हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधी परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे निम्मे लोक गरिज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले.


देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून : तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.


देवपित्यापासून व पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan