गणना 6:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणि टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या सपिठाच्या पोळ्या आणि तेल चोपडलेल्या बेखमीर चपात्या, आणि त्यांसोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणे अर्पण करण्यास आणावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या व तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्याबरोबर त्यांचे अन्नार्पण व पेयार्पण आणि एक टोपलीभर सपिठाची आणि बेखमीर भाकरी—जैतुनाच्या तेलात मळलेल्या जाड भाकरी व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी आणाव्या. Faic an caibideil |