Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 5:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 म्हणजे तुझे पोट फुगवण्यासाठी व तुझी मांडी सडवण्यासाठी हे शापजनक जल तुझ्या आतड्यांत शिरेल.’ ह्यावर त्या स्त्रीने ‘आमेन, आमेन’ असे म्हणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 याजकाने म्हणावे, म्हणजे तुझे पोट फुगविण्यासाठी व मांडी सडविण्यासाठी हे शापजनक पाणी तुझ्या आतड्यात शिरेल. मग त्या स्त्रीने आमेन, आमेन असे म्हणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.” “ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 5:22
16 Iomraidhean Croise  

शाप देणे हा त्याचा पेहराव बनला होता, म्हणून ते त्याच्या पोटात पाण्यासारखे व त्याच्या हाडांत तेलासारखे भिनून जावो.


इस्राएलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन.


त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो; त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो. आमेन! आमेन!


परमेश्वर सदासर्वकाळ धन्यवादित असो. आमेन, आमेन.


म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील, आपल्या मसलतीचे भरपूर फळ भोगतील;


तो मला म्हणाला, मानवपुत्रा, “जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर.” मी तो सेवन केला तेव्हा तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.


मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते त्या कटू जलात धुवावेत;


त्याने ते पाणी तिला पाजले म्हणजे असे होईल की, जर ती भ्रष्ट झालेली असली म्हणजे तिने आपल्या पतीचा विश्वासघात केलेला असला, तर हे शापजनक जल तिच्या पोटात शिरून कटुत्व उत्पन्न करील; तिचे पोट फुगेल, तिची मांडी सडेल व तिच्या लोकांमध्ये तिचे नाव शापदर्शक ठरेल.


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.


येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan