Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आणि वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी, कटोरे आदिकरून वेदीचे सर्व सामान तिच्यावर ठेवावे, त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिचे दांडे बसवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्नीपात्रे, काटे, फावडी व कटोरे या वेदीच्या सर्व वस्तू गोळा करून त्या वेदीवर ठेवाव्यात; मग तिच्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मग वेदीच्या सेवेसाठी वापरात येणारी सर्व पात्रे म्हणजे अग्निपात्रे, मांसाचे काटे, फावडी आणि शिंपडण्याचे कटोरे त्यावर ठेवावे. मग त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि त्याचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 4:14
7 Iomraidhean Croise  

आणखी शलमोनाने देवमंदिरातील सर्व पात्रे, सोन्याची वेदी, व समर्पित भाकरी ठेवण्याची मेजे;


बाभळीच्या लाकडाची पाच हात लांब व पाच हात रुंद अशी एक वेदी बनव; ती चौरस असावी. तिची उंची तीन हात असावी.


तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावीत, तिची सर्व उपकरणे पितळेची असावीत.


मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे;


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.


मग त्यांनी त्यावर तहशाच्या1 कातड्याचे आच्छादन घालावे; आणि त्यावर त्यांनी संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे; हे झाल्यावर कोशाला त्याचे दांडे बसवावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan