Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 35:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 इस्राएल लोकांच्या वतनातून जी नगरे लेव्यांना द्यायची ती मोठ्या वतनातून अधिक व लहान वतनातून कमी अशी द्यावीत; प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 लेवी लोकांना जी नगरे तुम्ही द्याल ती इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राला मिळालेल्या वतनाच्या प्रमाणात: म्हणजे ज्यांना पुष्कळ नगरे मिळाली त्यांच्याकडून पुष्कळ, परंतु ज्यांना थोडी नगरे मिळाली त्यांच्याकडून थोडी नगरे घेऊन द्यावीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 35:8
11 Iomraidhean Croise  

त्यांच्या रागाचा धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे; त्यांच्या क्रोधाचा धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे; मी त्यांची याकोबात पांगापांग करीन, इस्राएलात त्यांना विखरीन.


ह्या प्रकारे सर्व इस्राएलात लेवी आपली शिवारे व वतने सोडून यहूदा व यरुशलेम येथे आले; कारण त्यांनी परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करू नये म्हणून यराबाम व त्याचे पुत्र ह्यांनी त्यांना घालवून दिले होते.


त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले, तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही; प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते.


तथापि लेव्यांच्या वतनाच्या नगरांविषयी म्हणायचे म्हणजे त्यांत बांधलेली घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडवता येतील.


अधिक संख्येच्या वंशांना अधिक वाटा द्यावा व कमी संख्येच्या वंशांना कमी वाटा द्यावा; प्रत्येक वंशाला त्याच्या-त्याच्या संख्येप्रमाणे वतन द्यावे;


तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा; मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा; एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल; आपापल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हांला वतन मिळावे;


परमेश्वर मोशेला म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan