Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 35:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 35:34
20 Iomraidhean Croise  

मी इस्राएलामध्ये वस्ती करीन, आणि माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.”


“हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली.


यरुशलेमेत वस्ती करणार्‍या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1


मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


“हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका.


प्रथमत: त्यांचे दुष्कर्म व त्यांचे पाप ह्यांचे दुप्पट प्रतिफळ मी त्यांना देईन; कारण त्यांनी आपल्या प्रेतवत व अमंगळ मूर्तींनी माझा देश भ्रष्ट केला आहे. त्यांनी आपल्या किळसवाण्या वस्तूंनी माझे वतन भरले आहे.”


‘ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपण त्यांचा ताबा घेऊ,’ असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास,


ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.


ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, “तुमचे आता फारच झाले! सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याठायी आहे; तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता?”


मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे; त्यांच्यामुळे तुमची छावणी अशुद्ध होता कामा नये, कारण तिच्यामध्ये माझा निवास आहे.”


तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नयेस, पण त्याच दिवशी तू त्याला अवश्य पुरावेस; कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो; तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे तो देश विटाळवू नकोस.


हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस त्यांना क्षमा कर; तुझ्या इस्राएल लोकांमध्ये निरपराध माणसाच्या हत्येचा दोष राहू देऊ नकोस. ह्या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.’


कारण तुझ्यामध्ये असणारा तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तुझा देव परमेश्वर ह्याचा क्रोध तुझ्यावर भडकून त्याने तुझा संहार करून तुला पृथ्वीवरून नष्ट करावे असे न होवो.


‘तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाही’ तर कोकर्‍याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.


आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan