Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 34:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग ती सीमा यार्देनेपर्यंत उतरून खाली थेट क्षार-समुद्रापर्यंत जावी; तुमच्या देशाच्या चतुःसीमा ह्याच होत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’ “ ‘प्रत्येक दिशेने त्याच्या सीमा असलेला हाच तुमचा देश असेल.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 34:12
10 Iomraidhean Croise  

तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.


हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्‍यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.


तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन; मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील.


प्रभू परमेश्वर म्हणतो : “तुम्ही हा देश इस्राएलाच्या बारा वंशांना वतन म्हणून वाटून द्याल तेव्हा त्यात योसेफाचे दोन वाटे धरून त्याच्या सीमा येणेप्रमाणे असाव्यात.


व ती शफामापासून अईनाच्या पूर्वेस रिब्ला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनार्‍याच्या उतरणीपर्यंत जावी.


तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली की, “चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हांला मिळणार आहे, म्हणजे साडेनऊ वंशांना जो देश देण्याचे परमेश्वराने ठरवले आहे तो हाच;


तेव्हा तुमचा दक्षिण विभाग त्सीन रानापासून अदोम देशाच्या सरहद्दीपर्यंत असावा, आणि तुमची दक्षिण सीमा क्षार समुद्राच्या टोकाच्या पूर्वेपासून सुरू व्हावी;


यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता; तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा राहिला आहे.


त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्‍यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन,


Lean sinn:

Sanasan


Sanasan