Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 33:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा; तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे म्हणून मी तो तुम्हांला दिलेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 देशाचा ताबा घ्या व त्यात वस्ती करा, कारण तुम्ही त्यात वस्ती करावी म्हणून हा देश मी तुम्हाला दिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 33:53
16 Iomraidhean Croise  

तो त्याला म्हणाला, “तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्द्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.”


स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.


हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले; ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधार्‍यांना समजावे.’


आपणाला मनुष्यांतून घालवून देतील; आपली वस्ती वनपशूंत होईल; आपणाला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आपण आकाशातील दहिवराने भिजाल; मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान आपणाला होईपर्यंत आपणावरून सात काळ जातील.


तुला मनुष्यांतून घालवून देतील; तुझी वस्ती वनपशूंत होईल; तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ जातील.”


जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’


जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या देशात जाऊन तो वतन करून तेथे राहिल्यावर तुला असे वाटेल की, आसपासच्या राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा;


त्या वेळी मी तुम्हांला आज्ञा केली की, ‘तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला हा देश वतन म्हणून दिला आहे, तेव्हा तुम्ही सर्व योद्धे सशस्त्र होऊन आपल्या इस्राएल भाऊबंदांच्या आघाडीस पैलतीरी जा;


जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;


एखादे वेळी तू आपल्या मनात म्हणशील की, ‘ही राष्ट्रे माझ्यापेक्षा मोठी आहेत, मी त्यांना कसे घालवून देऊ?’


खंबीर हो, हिम्मत धर; कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील.


इस्राएल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले.


आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan