Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 33:52 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून द्या; आकृती कोरलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 तेव्हा तिथे राहणार्‍या लोकांना तुमच्यापुढून घालवून द्या, त्यांच्या सर्व कोरीव आकृत्या व ओतीव मूर्त्यांचा नाश करा व त्यांची सर्व उच्च स्थाने नष्ट करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 33:52
18 Iomraidhean Croise  

तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख ह्यांच्यासाठी एकेक उंच स्थान बांधले.


तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नयेस, त्यांची सेवा करू नयेस, आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नयेस, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावेस आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडेतुकडे करावेस.


तुम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.


परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करील तेव्हा त्यांचे मी तुम्हांला दिलेल्या संपूर्ण आज्ञेप्रमाणे करा.


हे इस्राएला, तू धन्य आहेस! परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.”


परमेश्वराने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले; परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.


तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका; त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला वाहायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका;


इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.”


तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हांला म्हणालो होतो; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?


Lean sinn:

Sanasan


Sanasan