Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 32:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 आणि मूळची नबो व बाल-मौन (ह्यांची नावे बदलून) व सिब्मा ही नगरे वसवली आणि त्यांनी वसवलेल्या नगरांना निरनिराळी नावे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 नबो व बाल-मौन आणि सिब्मा ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 32:38
15 Iomraidhean Croise  

आणि त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यांना पुन्हा दिली.


नबोच्या वंशातले : यइएल, मत्तिथ्या, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बनाया.


जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दु:खे होतील; ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नांवे उच्चारणारही नाही.


मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये.


हेशबोनाचे मळे व सिब्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत; राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकले आहेत. ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती; तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या.


बेल खचला आहे, नबो वाकला आहे; त्यांच्या मूर्ती पाठाळांवर घातल्या आहेत; तुमच्या मिरवणुकीच्या मूर्ती थकलेल्या जनावरांवर ओझ्याप्रमाणे लादल्या आहेत.


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


सपाट प्रदेशाला शासन झाले आहे; होलोन, याहस, मेफाथ,


किर्याथाईम, बेथ-गामूल, बेथ-मौन,


म्हणून पाहा, मी मवाबाचा स्कंधप्रदेश उघडा करीन, त्याची नगरे, त्याच्या सीमेतली नगरे, देशाला भूषण अशी बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही नगरे


सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.


“अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन


रऊबेनाच्या वंशजांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम,


तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनांस मिळाला, तसाच तूही ह्या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनांस मिळशील.


तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका; त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला वाहायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका;


Lean sinn:

Sanasan


Sanasan