Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 31:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मारण्यात आलेल्या ह्या पुरुषांबरोबर त्यांनी अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्या मिद्यानाच्या पाच राजांचाही वध केला; त्यांनी बौराचा मुलगा बलाम ह्यालाही तलवारीने मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्यांनी जे लोक मारले त्यामध्ये अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा हे मिद्यानाचे राजे होते. त्यांनी बौराचा मुलगा बलामासही तलवारीने मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ज्या लोकांचा त्यांनी वध केला ते मिद्यानांचे पाच राजे म्हणजे एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा हे होते. त्यांनी बौराचा पुत्र बलाम यालाही तलवारीने जिवे मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 31:8
21 Iomraidhean Croise  

दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत.


परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1


सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो.


दुष्ट जासूद संकटांत पडतो; पण विश्वासू वकील एक औषधी आहे.


कूशानाचे डेरे विपत्तीने घेरलेले मी पाहिले; मिद्यान देशाच्या कनाती थरथरत आहेत.


बलामाने देवाला उत्तर दिले, “मवाबाचा राजा, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठवला आहे की,


तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले, “बैल जसा शेतातील गवत फस्त करतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्वकाही फस्त करील.” त्या वेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता.


बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात, फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळवले की, “पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत;


याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची1 तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”


पाहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल, हे लोक शेवटल्या दिवसांत तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवतो.”


तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.


जिवे मारण्यात आलेल्या मिद्यानी बाईचे नाव कजबी होते; एका मिद्यानी घराण्याचा प्रमुख सूर ह्याची ती मुलगी होती.


कारण पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत त्यांनी तुम्हांला भुरळ घालून त्रस्त केले आहे.” कजबी ही एका मिद्यानी सरदाराची मुलगी असून मिद्यान्यांची जातबहीण होती; पौरामुळे मरी उद्भवली त्या दिवशी तिला जिवे मारले.


पाहा, पौराच्या प्रकरणी इस्राएल लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली त्याला ह्याच स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली.


शिवाय इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रिया व मुलेबाळे ह्यांना कैद केले; आणि त्यांची सर्व गुरेढोरे, सर्व शेरडेमेंढरे आणि सर्व मालमत्ता लुटली.


ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले.


त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan