Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 30:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तिचा कोणताही नवस किंवा जिवाला दंडन करणारे कोणतेही व्रत तिचा पती कायम करील किंवा रद्द करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वरास काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 30:13
13 Iomraidhean Croise  

मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.


मी तर त्यांच्या आजारात गोणपाट नेसत असे; मी उपास करून आपल्या जिवाला क्लेश देत असे; माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली.


मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे ह्याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?


तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो;


“त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्‍चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.


तो दिवस तुम्हांला परमविश्रामाचा शब्बाथ व्हावा व तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसर्‍या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बाथ पाळावा.”


ह्या सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे व कसलेच काम करू नये.


पण नवर्‍याने ती ऐकली त्याच दिवशी ती रद्द केली, तर तिच्या तोंडून जे नवस अथवा तिला बद्ध करणारी जी वचने निघाली असतील ती रद्द होतील; तिच्या नवर्‍याने ती रद्द केली आहेत म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.


दिवसामागून दिवस जात असता तिचा पती तिला काही बोलत नाही, तर तो तिचे सर्व नवस आणि ज्या ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल ती कायम करतो; ती ऐकली त्याच दिवशी तो काही बोलत नाही, ह्यावरून त्याने ती कायम केली आहेत असे समजावे.


प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे.


पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली.


एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan