गणना 30:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
12 पण नवर्याने ती ऐकली त्याच दिवशी ती रद्द केली, तर तिच्या तोंडून जे नवस अथवा तिला बद्ध करणारी जी वचने निघाली असतील ती रद्द होतील; तिच्या नवर्याने ती रद्द केली आहेत म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
12 पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्यास महत्व नाही. तिचा पती वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील.
12 पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील.
आम्ही पूर्वी जसे केले, म्हणजे आम्ही, आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहूदाच्या नगरांत व यरुशलेमेच्या आळ्यांत जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पण करण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू; कारण तेव्हा आम्हांला अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू.
स्त्रिया म्हणाल्या, “आम्ही स्त्रिया आकाशराणीस धूप जाळत होतो व तिला पेयार्पणे करीत होतो, तेव्हा तिच्या प्रतिमेच्या पोळ्या1 करून तिला पेयार्पणे करीत होतो, ते आमच्या नवर्यांच्या संमतीवाचून करीत होतो काय?”
मग याजकाने इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांना क्षमा होईल; कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पण केला आहे.
व तिचा पती ते ऐकून काही बोलला नाही व त्याने तिला मनाई केली नाही, तर तिचे सर्व नवस कायम राहतील व ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील.
पण ते ऐकून तिच्या बापाने तिला मनाई केली तर तिचे नवस किंवा ज्या कोणत्याही बंधनाने तिने आपणास बद्ध करून घेतले असेल त्यांपैकी कोणतेही कायम राहणार नाही; तिच्या बापाने तिला मनाई केली म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली, तर तिने केलेले नवस आणि अविचाराने ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती रद्द ठरतील; आणि परमेश्वर तिला क्षमा करील.
तिचा नवरा एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटेल तसे कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत येथेच राहा; परमेश्वर आपले वचन पुरे करो म्हणजे झाले.” तेव्हा ती स्त्री घरी राहिली, आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले.